1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती – किरीट सोमय्या

thumbnail-thefreemedia
Spread the love

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. हजारो कोटी रुपयांची बेनामी संपत्ती अजित पवार यांच्याकडे आहे. त्याची उत्तरे त्यांनी द्यावीत. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडला आहे, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावे, असे यावेळी सोमय्या म्हणाले. नवाब मलिकांचे सारे आरोप हे केवळ पवार कुटुंबियांवर सुरू असलेल्या आयटीच्या धाडी लपवण्यासाठीच, हे घाणेरडे राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही. महाराष्ट्राला पवार परिवाराने खूप लुटले असल्याचेही सोमय्या म्हणाले.

यावेळी सोमय्या यांनी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला लुटल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, अजित पवारांकडे एक हजार 50 कोटींची संपत्ती कुठून आली?, अजित पवारांनी यासंदर्भात माहिती द्यावी. पत्रकार परिषदेत यासंदर्भात ते कोणताही माहिती देत नसल्याचेही सोमय्या म्हणाले. दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार, असे रविवारी ट्विट करत किरीट सोमय्या यांनी सांगितले होते. पण, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला.

ते म्हणाले, पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले? कुठून पैसे आले? कसे आले? ते कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडला आहे, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावे, असे यावेळी सोमय्या म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आंध्र प्रदेश-ओडिशामध्ये वादळाचा इशारा, या शहरांमध्ये...

    December 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveओडिशा आणि आंध्रप्रदेश येथे वादळ ‘जवाद’ ने चांगलाच जोर पकडला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट सा...

    खाणक्षेत्रासाठी योग्य धोरणे आखली नाहीत तर देशाचा विक...

    July 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे 6व्या ‘खाणी आणि खनिजांवरी...

    इस्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर!

    March 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइस्रायलच्या पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ” पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताला पहिली अध...