1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

आज दि. २२ एप्रिलपासून लातूर येथील उदगीरमध्ये ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे. आजपासून तीन दिवस हे साहित्य संमेलन चालणार असून तिन्ही दिवस राज्यभरातील वाचक आणि रसिक या मेळाव्याचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. जेष्ठ साहित्यिक भारत सासणे हे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत.

लातूरमधील उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२, २३ आणि २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे. उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे.

साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७.३० ते १० यावेळेत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी ग्रंथपूजन संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते होणार असून ग्रंथदिंडी महत्त्वाच्या मार्गांवरून संमेलनस्थळी दाखल होणार आहे. त्यानंतर विविध दालनांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.

मुख्य उद्घाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हजर, शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण, सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. यानंतर दिवसभर विविध विषयांवरील परिसंवाद पार पडणार आहेत. संध्याकाळी लोककला सादरीकरण होणार आहे.

Claim Free Bets

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांची मुलाखत आणि विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. गझल कट्टा आणि कवी कट्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच बालकवी संमेलन आणि बाल कथाकथनचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उदगीर हे कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवर असल्यामुळे या भागातील निमंत्रीत कवींचे काव्यवाचन होणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘दादा’ असल्याने मुंबईत शिवसेनेची दादागीर...

    February 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमुंबईत शिवसेनेचीच दादागीरी चालणार कारण मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचं म्हणत आम्ही घुसलो तर नागपुरात जाणं मुश...

    एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणा-या; अवनी लेखराने पॅराल...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचत वैयक्तिक दुसरे पदक जिंकले आहे. तिने एक...

    पहिल्या २ तासात ४ राज्यांमध्ये भाजप सुसाट; पंजाबात प...

    March 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात तब्बल ३७८ दिवस झालेलं राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन, त्यानंतर मोदी सरकारने घेतलेली शरणागती, कोरोनान...