नागपूर: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात वादळ उठलाय. महाविकास आघाडी सरकारचे काय होणार याच्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे इतकी वर्ष निष्ठावंत असणारे नेते एकनाथ शिंदे हेच संपर्कात नसल्याने शिवसेनेत गोंधळाची स्थिती आहे. एकनाथ सिंध्ये हे सध्या गुजरात मध्ये आहेत त्यांच्या सोबत ३५ आमदार असल्याचा दावा भाजप नेत्यांनाही केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्या सर्व आमदारांशी संपर्क झाल्याचा आणि एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क केल्याचे सांगता आहेत.
एकनाथ शिंदे हे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक आहेत आहेत आणि ते नक्कीच बिना अटींचे परततीळ असेही संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेचे काही आमदार आणि एकनाथ शिंदे हे सध्या संपर्कात नाहीत. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु भाजपने लक्षात ठेवावे की महाराष्ट्र राजस्थान किंवा मध्य प्रदेशपेक्षा खूप वेगळा आहे असेही शिवसेना नेते संजय राऊत थोड्या वेळे पूर्वी म्हणाले होते.
मी ऐकले आहे की आमचे आमदार गुजरात राज्यातील सुरतमध्ये आहेत आणि त्यांना जाऊ दिले जात नाही, परंतु ते नक्कीच परत येतील कारण ते सर्व शिवसेनेला समर्पित आहेत. मला खात्री आहे की आमचे सर्व आमदार परततील आणि सर्व ठीक होईल असेही शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.