राज्यातील शाळा आज ४ ऑक्टोबर पासून सुरु झाल्या. सोबतच भंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) शाळा देखील सुरु झाली. पण काही दिवसांअगोदर भंडाऱ्यातील मनरो शाळेच्या पटांगणात कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अवैध बांधकाम सुरू होते. ७० दुकानांचे बांधकाम शाळेच्या मैदानावर करण्याचे काम पटांगणात सुरु होते. त्याकरिता शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका (PIL) टाकली आहे. या बांधकामाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना, काही पक्ष तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थ्यांचा विरोध आहे. सध्या या बांधकामावर कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळाला आहे. या विषयी माजी विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहे त्या ऐकून घ्या.
भंडारा जिल्ह्यातील लाल बहादुर शास्त्री विद्यालय सुरू झाल्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांची सायकली ठेवण्याची व्यवस्था काय केलेली आहे परिस्थिती काय आहे पाहणी करण्यासाठी गेले असता शाळेच्या आवारात सायकली ठेवायला जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था शाळेतील आवारातील रस्त्यावर करण्यात आल्याचे दिसून आले सायकली ठेवण्यासाठी शाळेच्या आवारात रस्त्यावर करण्यात आल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या फोर व्हीलर शाळेच्या बाहेर पार्किंग कराव्या लागत आहेत. “शासनाला विनंती आहे की त्यांनी शाळेतील क्रिडांगणाची जागा व सायकल पार्किंगची जागा रिकामी करून द्यावी त्याशिवाय शाळेला आवाराची अडचण भासत आहे क्रीडांगणाच्या अभावी शाळेची काय अवस्था होईल तुम्ही विचार करा”, असे अभिजित वंजारी (याचिकाकर्ता) म्हणालेत.
चला शाळेत पुन्हा परत जाऊ या :-
तसेच २ ऑक्टोबर २०२१ रोजी १०.३० च्या सुमारास रोजी मनरो शाळेच्या प्रार्थनास्थळी सर्व माजी विद्यार्थी जमले होते. त्यावेळीस उपस्थित असलेल्या सर्वांनी प्रार्थना करून माननीय लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांना अभिवादन केले. तसेच राष्ट्रगीत,प्रतिज्ञा व वंदे मातरम सामूहिक गान देखील म्हणण्यात आले.