1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अ‍ॅमेझॉनने केली ग्राहकाची फसवणूक; फोनेऐवजी भेटले चार्जर व केबल

amazon
Spread the love

लॉकडाऊन मध्ये खरेदीसाठी सर्रासपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. मात्र यामध्ये बऱ्याचदा फसवणुकीच्या घटना घडतात. अशीच एका घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. एकाने अ‍ॅमेझॉनकंपनीकडून ऑनलाईन माध्यमातून मोबाईल खरेदी केला. कंपनीने मोबाईलच्या नावाखाली पाठवलेले कुरियर ग्राहकाला मिळाले. मात्र, बॉक्समध्ये मोबाईलऐवजी केवळ चार्जर आणि केबल ग्राहकाला मिळाली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला आहे.

याबाबत विपुल विनोद पाटणी (वय ३३, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अ‍ॅमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पाटणी हे एका कंपनीत काम करतात. त्यांनी रेडमी कंपनीचा मोबाईल १४ हजार ४९९ रुपयाला ऑर्डर केला. मोबाईलची डिलिव्हरी पाटणी यांना मिळाली.

डिलिव्हरी मिळाल्यानंतर पाटणी यांनी मोबाईलचा बॉक्स न उघडता तसाच ठेवला. काही वेळानंतर पाटणी यांच्या पत्नीने त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेसमोर मोबाईलचा बॉक्स उघडला. त्यामध्ये केवळ मोबाईल चार्जर व केबल तसेच इतर डॉक्युमेंट असल्याचे दिसले. बॉक्समध्ये मोबाईल आढळुन आला नाही. ती माहिती पत्नीने पाटणी यांना दिली. त्यांनी याबाबत अ‍ॅमेझॉन कंपनीला संपर्क केला. कंपनीने या प्रकरणाचा तपास करून कळवतो, असे सांगितले. अ‍ॅमेझॉन कंपनीकडून पाटणी यांना मेल आला. त्यात कंपनीने पाटणी यांना त्यांच्या ऑर्डरची सुरक्षित डिलिव्हरी केली असल्याचे सांगितले. याप्रकरणी पाटणी यांनी अ‍ॅमेझॉन कंपनी आणि डिलिव्हरी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दिली. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Redmi Note 11 सिरीजचे ग्लोबल मार्केटमध्ये पाच स्मार्...

    January 20th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Redmi Note 11 सिरीजमध्ये पाच स्मार्टफोन असतील जे विविध जागतिक बाजारपेठांमध्ये लॉन्च केले जातील, फोन...

    भारतातील पहिली डिजिटल लोकअदालत महाराष्ट्र, राजस्थान ...

    August 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: राजस्थान राज्य विधी सेवा प्राधिकरण (RSLSA) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (MSLSA) यांच्या...

    Apple च्या ‘Lockdown Mode’ विषयी जाणून घ्या

    July 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:I-Phone बनवणारी Apple ने iPhone, iPad, and Mac कम्प्युटर्ससाठी “lockdown” मोड आणला आहे. “lockd...