1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी सीएए कायद्यात सुधारणा करा’, काँग्रेस नेत्याची मागणी

Spread the love

नागरिकत्व कायद्यात सुधारणा व्हावी; मिलिंद देवरा

बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर आता संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी बांगलादेशी हिंदूंच्या संरक्षणासाठी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’बांगलादेशमध्ये वाढणारी सांप्रदायिक हिंसा अत्यंत चिंताजनक आहे. धार्मिक छळापासून पळून जाणाऱ्या बांगलादेशी हिंदूंचे संरक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी सीएए मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. भारतीय मुस्लिमांना बांगलादेशी इस्लामवाद्यांशी बरोबरी करण्याचा कोणताही सांप्रदायिक प्रयत्न भारताने नाकारला पाहिजे.’

दरम्यान, यासंदर्भात बोलतांना भाजपा प्रवक्ते अमित मालवीय म्हणाले की,’बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात असून इथे सीएए या मानवतावादी कायद्याचे महत्त्व पुन्हा दर्शवत आहे. सीएएला ममता बॅनर्जींचा विरोध आणि आता बांगलादेश हिंसाचाराचवर त्यांचं मौन याची पश्‍चिम बंगालमध्ये राहणाऱ्या हिंदूंना चिंता वाटली पाहिजे. ज्यांना तृणमुल सरकारमुळे अनेक समस्या आणि उपेक्षाला सामोरे जावे लागत आहे.’

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    क्रिकेटपटू गावसकरांना ‘सनी’ टोपण नाव देण...

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveक्रीडा क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षक व क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून नावाजलेले वासू परांजपे यांचे निधन झाले आ...

    Hijab Verdict :कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय,...

    March 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कर्नाटक उच्च न्यायालयाने २५ फेब्रुवारीला या केस शी असलेली सर्व कारवाही व याचिकांवर सुनावणी पूर्ण के...

    व्हिडीओ व्हायरल : गाझियाबादमधील विकृताला तंदूरमध्ये ...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक माणूस ज्यात थुंकून रोटी...