नागपूर: राष्ट्रीय सुरक्षा सल्लादार (NSA) अजित डोभालच्या घरी एका व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. रिपोर्ट्सनुसार एका अज्ञात व्यक्तीने जवळजवळ सकाळी ७ वाजून ४५ मिनीटांनी कार घेऊन अजित डोभाल यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या घरात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी योग्य वेळी त्याला थांबविले आणि ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यावर त्या व्यक्तीची मानसिकस्थिती व्यवस्थित वाटत नव्हती.
पोलिसांनी त्याला पकडल्यावर तो व्यक्ती अनेक गोष्टी बडबडत होता. त्याचे असे म्हणणे होते कि, कोणी तरी त्याच्या शरीरात चीप लावली आहे आणि त्याला कंट्रोल केले जात आहे. पण जेव्हा त्याला तपासले गेले तेव्हा त्याच्या शरीरातून कोणतीही चीप मिळाली नाही.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला व्यक्ती हि कर्नाटक बंगलोरची राहणारी आहे. त्याचे नाव शंतनू रेड्डी सांगण्यात येत आहे. तो व्यक्ती नोएडा येथून लाल रंगाची SUV कार किरायाने घेऊन डोभाल यांच्या घरी पोहचला. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
NSA अजित डोभाल यांची सुरक्षा CISF करते. त्यांना गृह मंत्रालयाकडून Z+ केटेगिरी ची सुरक्षा देण्यात आली आहे.