देशात केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ लष्करी भरती योजनेला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. या योजनेच्या विरोधात अनेक तरुण रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातून या योजनेला विरोध केला जात असला तरी प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि यूपीमध्ये या योजनेला प्रचंड विरोध होत आहे.
ही योजना केवळ चार वर्षांची असून अशा पद्धतीने कंत्राटी भरती करुन या योजनेतील मुलांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या भविष्याचं काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या योजनेवरुन देशभरात गदारोळ सुरू असताना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या त्यांनी योजनेच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचारावर खेद व्यक्त केला आहे. तसचं या योजनेतील प्रशिक्षित तरुणांना महिंद्रा ग्रुपतर्फे नोकरीची संधी देण्यात येणार असून, त्या तरूणांना रोजगार आम्ही देऊ असं देखील त्यांनी ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे.
FAQs
मुंबई-हैद्राबाद हायस्पीड बुलेट ट्रेन ३ तासांत कापणार अंतर
लष्करातील ३९ महिलांना सर्वाच्च न्यायालयाचा दिलासा; मिळणार स्थायी कमिशन
बिहारमध्ये महागठबंधन तुटले; काँग्रेस आरजेडी लढणार स्वतंत्र निवडणूक
चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; विमानांची उडाणे रद्द, शाळांना ठोकले कुलूप तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन
मुंबईतील साठ मजली टॉवरला लागली भीषण आग