केंद्र सरकारकडे ६२५ रूपये पडून
रेल्वे भर्ती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून आंदोलन सुरू केलं आहे. बिहारच्या गया शहरात आंदोलकांनी रेल्वेचे डबे पेटवून दिल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या भरती प्रक्रियेबाबत वास्तव सांगितलं आहे. आव्हाडांनी याबाबत टि्वट करीत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
“बिहारमध्ये सुरू असणाऱ्या रेल्वे बोर्ड-NTPC साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढाईतील एक वास्तव सांगतो. जागा होत्या सगळ्या मिळून ३७ हजारांच्या आसपास. अर्ज आले जवळपास १,२५,००,००० (सव्वा करोड). आणि एका अर्जाची किंमत होती ५०० रुपये. एकूण झाले ६२५ करोड रुपये. एवढा पैसा, १ वर्ष झाले केंद्राकडे पडून आहे. त्यावरच वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं.यावर एकतरी मीडिया हाऊस ने चर्चा घडवून आणली का..?” असे टि्वट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
”NTPC च्या परीक्षेसाठी एवढे अर्ज म्हणजे देशातील वास्तव आहे. हे भयाण वास्तव देशातील रोजगाराचे, बेरोजगारीचे आहे. हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो.वेळीच सावध होऊन तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.