1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘वसुली प्रकरणात अनिल देशमुख फसवले गेले’

Spread the love

प्रकाश आंबेडकर यांचा दावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात फसवल्याचं दिसत आहे. माझी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की, त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. त्यांनी कायद्याला सहकार्य केले तर ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
यांनी केला.

उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणावरुन प्रकाश आंबेडकरांनी हा दावा केला आहे. नागपूर येथील रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ”या प्रकरणात दाखवलं एक जातय आणि करतयं दूसरचं, असा प्रकार सुरु आहे. आता हा प्रकार थांबवला पाहिजे, असं मला वाटतय, अन्यथा राज्यपालांनी यात लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी मागणी आम्ही करणार आहोत, अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे.

”अनिल देशमुख या प्रकरणात फसले गेले आहेत, कलेक्शन झाले असल्याची माहिती विभागाकडून मिळते. पण चौकशी यंत्रणेला देशमुखांकडे पैसे मिळालेले नाही, मग हे पैसे कोणाकडे गेले, वसुलीतून जे पैसे जमा झाले, ते कोणाकडे गेले, याचा खुलासा अनिल देशमुखांनी करायला हवा. त्यांनी कायद्याला सहकार्य केल्यास, ते माफीचा साक्षीदार होऊ शकतात आणि त्यांची सुटका होऊ शकते. १०० कोटी वसुली प्रकरणात मोहरे समोर येत आहेत; पण मुख्य वजीर आणि राजा समोर येत नाही. पोलीस यंत्रणाही त्यांना समोर आणत नाही. त्यामुळे राज्यपालांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Amar Jawan Jyoti I आज अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्...

    January 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदिल्ली येथे इंडिया गेट (India Gate) वर जळणारी अमर जवान ज्योतीचे (Amar Jawan Jyoti) आज नॅशनल वॉर मेमोरियल (N...

    Punjab Elections 2022I आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवं...

    January 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विधानसभा निवडणूकीत (assembly elections) कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी निवडणूक आयोगाने रैली आणि ज...

    मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना प्रशासनान...