एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर असताना त्यांच्या आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजप आणि एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल पबर यांना या मुद्द्यावरुन वेठीस धरलं आहे. एसटी कर्मचारी अनिल परब यांच्यावर आक्रमक झाले आहेत. त्यावर आता अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एसटी कामगारांच्या 28 युनियन आहेत. त्या सर्वांच्या प्रतिनिधींसोबत बसून सरकारनं कामगारांच्या अनेक मागण्या मार्गी लावल्या आहेत. विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त आणखीही कुठले मुद्दे असतील तर त्यावरही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण प्रत्येकाशी चर्चा शक्य नाही. त्यामुळं चर्चा नेमकी कुणाशी करायची हे कामगारांनीच सांगावं, असं अनिल परब म्हणाले आहेत.
एसटी कामगारांचा संप १५ दिवसांनंतरही सुरूच आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार, आज कामगारांचे प्रतिनिधी मुख्य सचिवांच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहेत. एसटी कामगारांचा संप १५ दिवसांनंतरही सुरूच आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार, आज कामगारांचे प्रतिनिधी मुख्य सचिवांच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहे