जागतिक मराठी भाषा गौरव दिनी होणार प्रकाशन
नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘जागतिक मराठी भाषा गौरव’ दिनानिमित्त ‘मराठीचे शिलेदार’ प्रकाशनातर्फे ‘माय मराठी’ प्रातिनिधिक कविता संग्रहासाठी महाराष्ट्रातील काव्यप्रेमीनी आपली एक कविता पाठविण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठी भाषिकांना नाविन्यपूर्ण साहित्यमेवा देण्याचा संस्थेचा मानस आहे. मागील तीन वर्षात ‘आम्ही काव्यस्तंभ’, ‘आम्ही काव्यरत्न’ व ‘आम्ही हायकूकार’ हे तीन प्रातिनिधिक कवीता संग्रह राज्यातील कवी कवयित्रींच्या दर्जेदार काव्यरचनांनी नटलेला काव्यठेवा आम्ही मराठी साहित्यप्रेमींना दिला आहे. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे मराठी भाषेला अधिक श्रीमंती प्राप्त झाली आहे. यंदाच्या ‘माय मराठी’ काव्यसंग्रहासाठी आपण मराठी भाषेच्या गौरववार्थ काव्यसाहित्य दि. १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राहुल पाटील यांच्या ७३८५३६३०८८ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावे.
‘माय मराठी’ प्रातिनिधिक कविता संग्रह मराठी साहित्याचा दीपस्तंभ असेल, ज्यात आपल्या तेजस्वी लेखणीचा प्रकाश संपूर्ण विश्व तेजोमय करेल. करिता आपण एका काव्यरचनेसह सहभागी होऊन भाषा जिवंत ठेवण्याचा संकल्प करावा. दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी जागतिक मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठी’ प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून या प्रकाशन समारंभात काव्यसंग्रहात सहभागी होणा-या सारस्वतांना संग्रहाच्या दोन प्रती व मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे सहभागी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी सहभाग नोंदणीसाठी संस्थेच्या मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे यांच्याशी या 96243 12560 क्रमांकावर संपर्क करावा. असे संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी कळविले आहे.