1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

डॉ उज्वला चक्रदेव यांची नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

ujjawala
Spread the love

नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ उज्वला श‍िरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ११ सप्टें) डॉ उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.

डॉ उज्वला चक्रदेव (जन्म २७.०८.१९६२ ) यांनी राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.

डॉ उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे.

Claim Free Bets

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जूलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती.

पुणे येथील आयआयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ उज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.

    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    करूणा शर्माचा कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकरूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना...

    महाकालीनगर येथे माँ जिजाऊंना अभिवादन

    January 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंगरोड महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरी च्यावतीने किशोर पवार यांच्या...

    धक्कादायक! बीडमध्ये कोरोना मृताच्या यादीत 216 जिवंत ...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागरीकांनी केला संताप व्यक्त कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत देण्यासा...