संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अमेरिकेच्या शॉम्बी शार्प यांची भारतातील जागतिक संस्थेचे ‘रेजिडेंट कोऑर्डिनेटर’ म्हणून नियुक्ती केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, शार्प 25 वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी काम करत आहे. हा अनुभव त्यांना या नियुक्तीसाठी उपयोगी पडेल.’ त्यांनी नुकतेच आर्मेनियामध्ये (Armenia) संयुक्त राष्ट्रांचे ‘रेजिडेंट कोऑर्डिनेटर’ म्हणून काम पाहिले.
दरम्यान, शार्प यांनी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा (UNDP) मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते आर्मेनियामधील निवासी प्रतिनिधी, जॉर्जियामधील (Georgia) डिप्टी रेजिडेंट रिप्रेजेंटेटिव, लेबनॉनमधील (Lebanon) डिप्टी कंट्री डायरेक्टर, यूएनडीपी युरोप आणि रशियन फेडरेशनच्या कॉमनवेल्थमधील स्वतंत्र देशांसाठी प्रादेशिक एचआयव्ही/एड्स प्रॅक्टिस टीम लीडर, न्यूयॉर्कमधील वेस्टर्न बाल्कनसाठी कार्यक्रम व्यवस्थापक आणि रशियन फेडरेशनमधील सहाय्यक निवासी प्रतिनिधी म्हणूनन होते. निवेदनानुसार, संयुक्त राष्ट्रात सामील होण्यापूर्वी शार्पने झिम्बाब्वेमधील (Zimbabwe) आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था ‘केअर इंटरनॅशनल’ मध्येही काम केले.