1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाराष्ट्र I विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता

Spread the love

नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष विद्यापीठ कॅम्पस बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा विद्यापीठे, महाविद्यालये सुरु व्हावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासर्व विषयी ट्विट करून माहिती दिली.

https://twitter.com/samant_uday/status/1511637736456740865

पुढे ते म्हणाले विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. तसेच लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) 37 कोटी 58 लाख 33 हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    समुद्रपूर येथे मतदान अधिका-यांचे प्रशिक्षण संपन्न

    January 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नगर पंचायतीच्या उर्वरीत दोन प्रभागातील निवडणूक दि. १८ जानेवारी रोजी घेण्यात ये...

    मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं; देवेंद्र फड...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने जाणवूच दिलेलं नाही असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्...

    यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमे...

    June 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: Presidential Election Candidate 2022 :अपक्ष पक्ष आणि मंगळवारी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला घेऊन झा...