सध्या राज्यात खूप गाजावाजा चाललाय तो,मुंबईजवळ क्रूझवरील ड्रग्ज पार्टी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उधळली होती त्याचा. या कारवाईत: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान व अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाईच फेक असल्याचा दावा केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं तसेच बॉलीवूडमधील स्टार कलाकारांना लक्ष्य करून पूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र एनसीबीला हाताशी धरून रचलं गेलं आहे. गेल्या एका वर्षात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, भारती सिंग, अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोण, आर्यन खान यांच्यावर केलेली कारवाई केवळ पब्लिसिटीसाठी होती. याच्या मुळाशी गेल्यास धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. याआडून खंडणीवसुलीचे काम केले जात आहे.
यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री मलिक यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नवाब मलिक महाराष्ट्र राज्यात मंत्री आहे याची खंत वाटते. आता राष्ट्रवादीवाले बॉलीवूडची पण भांडी घासायला लागले की काय ?असा हल्लाबोल राणे यांनी केला आहे.
मुंबईत फिल्म इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रातील बड्या व्यक्तींच्या मागे या यंत्रणा लावण्यात आल्या आहेत. त्यांना भीती घालण्यासाठी खासगी रलोकांना हाताशी धरले गेले आहे. फ्रॉड आणि प्रायव्हेट डीटेक्टिव्ह असलेल्या व्यक्ती यात सामील आहेत. त्यांच्या माध्यमातून बदनामी करून लोकांना घाबरवून खंडणी वसुल केली जात आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता.