बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या अनेक दिवसापासून अं’मली पदार्थ प्रकरणात कोठडीत आहे. अशातच तब्बल २६ दिवसांनी आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. आर्यन खानच्या वकिलांनी अनेकवेळा त्याच्या जामिनाची याचिका कोर्टामध्ये सादर केली होती. परंतु कोर्टाने नेहमी कोणत्या का कोणत्या कारणाने त्याचा जामीन नाकारला होता. अशातच गुरुवारी (२८ ऑक्टोबर) आर्यनचा जामीन कोर्टाने स्वीकारला आहे. या बातमीने खान कुटुंब खूप आनंदात आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील सोशल मीडियावर त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत.
आर्यनचा जामीन हा खान कुटुंबासाठी जरी दिलासा देणारी गोष्ट असली, तरी या जामीनासोबत कोर्टाने त्याच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. या पूर्ण करताना आर्यनला अवघड जाणार आहेत. कोर्टाने एक-दोन नाहीतर तब्बल अकरा अटी ठेवल्या आहेत आणि जर या अटी मंजूर असून आर्यन या अटींचे पालन करणार असेल, तरच त्याला जामीन दिला जाणार आहे. चला तर पाहूया आर्यन खानच्या जामीनासाठी कोर्टाने कोणत्या अकरा अटी ठेवल्या आहेत.
या आहेत अकरा अटी
१.पुन्हा या अपराधात सामील न होणे.
२.केसमधील इतर कोणत्याच आरोपीच्या संपर्कात न राहणे.
३.कोर्टाच्या परवानगी शिवाय देश न सोडणे.
४.सोशल मीडियावर या केस संबंधात कोणतेही वक्तव्य न करणे.
५.चौकशी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय मुंबईतून बाहेर न जाणे.
६. जामीन काळ सुरू झाल्यावर तो लांबवण्याचा प्रयत्न न करणे.
७. दर शुक्रवारी ११ ते २ दरम्यान एनसीबी कार्यालयात हजर राहणे
८.केसच्या सुनावणीसाठी दिलेल्या तारखेला कोर्टात हजर राहणे.
९. एनसीबीने बोलवल्यानंतर लगेच कार्यालयात हजर राहणे.
१०. एनसीबी कार्यालयात पासपोर्ट जमा करणे.
११. जर वरीलपैकी कोणत्याही अटीचे उल्लंघन केले तर जामीन त्वरित रद्द होऊ शकतो.
वरील या सगळ्या अटींचे जर आर्यनने पालन केले तरच त्याला जामीन दिला जाणार आहे. त्याला शनिवारी (३० ऑक्टोबर) रोजी जामीन दिला जाणार आहे. यासोबतच त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांना देखील जामीन मिळणार आहे. या निर्णयाने सगळेच खुश आहेत, परंतु आता आर्यन या सगळ्या अटींचे पालन करेल की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.