भारताने काल १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. तसेच दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील युद्धात, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना कोणतेही शिथिलता न आणण्याचे आवाहन केले. कोरोनाविरोधात जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत मास्कसारखी शस्त्र वापरणे बंद करू नका, असे त्यांनी सांगितले.
‘कितीही चांगले चिलखत, कितीही आधुनिक चिलखत असले तरी, चिलखतीपासून संरक्षणाची संपूर्ण हमी आहे तरी युद्ध चालू असतानाही शस्त्रे फेकली जात नाहीत. मी विनंती करतो की आपण आपले सण अत्यंत काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत. देशाला मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे माहित आहे. पण, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहू नये’ असे ते म्हणाले.
आपल्याला जशी चपला घालूनच घराबाहेर पडण्याची सवय झालेली आहे. तशीच मास्कचीही सवय लावून घ्या. लसीकरणाने १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे.पण अद्यापही लस न घेतलेल्यांनी मास्कला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी कोरोनाविरोधातील लस घेतली आहे, त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयत्न केल्यास कोरोनाला लवकर पराभूत करू शकू. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही येणारे सण पूर्ण खबरदारी घेऊन साजरे करा, असेही मोदींना आपल्या