भारताने पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप उभारला असून उत्तराखंड येथील देवस्थळ या डोंगरावर उभारण्यात आला आहे. आकाशातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी हा टेलिस्कोप मदत करू शकणार आहे. इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप (आयएलएमटी) हा देशातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप असून तो आशियातील सर्वात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप आहे.
बेल्जियम, कॅनडा आणी भारताच्या शास्त्रज्ञांनी हा टेलिस्कोप विकसित केला आहे. नैनिताल येथील देवस्थळ येथे २ हजार ४५० मीटर उंचीवर बसवण्यात आला आहे. ५० कोटी रुपये खर्च करून हा ४ मीटरचा लिक्विड मिरर टेलिस्कोप बनवण्यात आला आहे. खगोलशास्त्रीय संशोधनासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. लिक्विड मिरर टेलिस्कोपच्या माध्यमातून खगोलशास्त्रीय तुकडे, लघुग्रह, सुपरनोव्हा आणि गुरुत्वाकर्षण भिंग इत्यादींची माहिती घेण्यात मोठी मदत होईल.