विदर्भातील वर्धा जिल्हा महात्मा गांधीच्या कार्यप्रणालीचे उगमस्थान म्हणून ओळखला जातो. सेवाग्राम हे त्यांच्या कार्याची साक्ष म्हणून अनेकांना आजही प्रेरणा देत असते. वर्धा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्यक्षम व सक्षम अधिकारीही आपल्या अनुभवाच्या शिदोरीने शिक्षण क्षेत्रास अधिक प्रगत करण्याचा ध्येय उराशी बाळगून आपले कर्तव्य बजावत असतात. वर्धेच्या समुद्रपूर तालुक्यातील इयत्ता सातवी पर्यंतच्या जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, सायगव्हाण या दोन शिक्षकी शाळेला प्रशासकीय अधिका-यांनी अप्रगत विद्यार्थी विरहीत गुणवत्तापूर्ण प्रगत महाराष्ट्र शहा पुरस्कार उपक्रमांतर्गत निवड झालेल्या ११ शाळापैकी सायगव्हाण येथे दि ११ फेब्रुवारी रोजी प्रेरणादायी व मार्गदर्शनीय भेट दिली.
भेटीस आलेल्या तपासणी पथकात मा. गटविकास अधिकारी साहेब, हिंगणघाट, मा. गटशिक्षणाधिकारी साहेब, हिंगणघाट, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा येथील अधिव्याख्याता डॉ. मधुमती सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी हिंगणघाट श्री टाकळे साहेब, केंद्र प्रमुख विद्या बोभाटे हिंगणघाट तसेच विषयतज्ञ प्रशांत चौधरी व परिमल शेंडे सहभागी होते. सर्व अधिका-यांचे सायगव्हाण शाळेच्या वतीने विषय शिक्षक रामराव मेहेत्री यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक यांची साहित्यसंपदा असलेल्या ‘साहित्यगंध’ दिवाळी अंक, काव्यसंवेदना, बळीराजा, जिजाऊ, गुरू गौरव, काव्यस्तंभ विशेषांक व अवाका, निखारा, आधारवड कवितासंग्रह भेट देऊन सन्मान करण्यात आला.
शाळेतील अभिलेखे, दस्ताऐवज, गुणवत्ता विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रियेची तपासणी करण्यात आली. निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत सर्व अधिका-यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दोन वर्षानंतर शाळेत अधिकारी वर्गांनी भेट दिल्याचा आनंद शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेह-यावर या निमित्ताने दिसून आला. शाळेच्या सर्वंकष प्रगतीसाठी आणि गुणवत्तेच्या दृष्टीने प्रेरणा व मार्गदर्शनाची मुहूर्तमेढ रोवून शुभेच्छा दिल्याबद्दल शाळेच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांनी सर्व अधिका-यांचे आभार मानले. पुढील भेटीसाठी…!!