पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील हवामान बदल शिखर COP 26 परिषदेला संबोधित केलं. त्यांनी ‘लाईफ’ या एका शब्दाची चळवळ जगात सुरू व्हावी, असं आवाहन केलं आहे. गेल्या काही दशकांपासून जागतिक तापमान वाढ होत असून ते जगासाठी अत्यंत धोकादायक आहे, याचा सर्वात मोठा प्रभाव विकसनशील देशांवर होतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ग्लासगो इथं सुरु असलेल्या COP 26 या हवामान बदल यासंबंधीच्या परिषदेमध्ये ते बोलत होते. भारत शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असून देशातील नागरिकांच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने योजना आखत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नावर कृती करताना मिटिगेशन जेवढं महत्व मिळत तेवढेच महत्व अडॉप्टेशन मिळत नाही. त्यामुळे विकसनशील देशांवर अन्याय होतोय. वातावरण बदल किंवा जागतिक तापमानवाढ याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतो, तेच याला सर्वात प्रथम बळी पडतात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील सीओपी २६ हवामान बदल शिखर परिषदेला संबोधित केलं. त्यांनी ‘लाईफ’ या एका शब्दाची चळवळ जगात सुरू व्हावी, असं आवाहन केलं आहे. लाईफ चा अर्थ म्हणजे ‘लाईफस्टाईल फॉर एनव्हॉयरमेंट’ असंही त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी जगासमोर भारताचं हवामान बदलाविषयी चे व्हिजन ठेवतानाच या पर्यावरणीय प्रश्नाचा सामना करण्यासाठी ‘पंचामृत’ तत्त्वाचा आधार घेत ५ आश्वासनंही दिलीत.
-भारत २०३० पर्यंत आपल्या अजीवाश्म ऊर्जा क्षमता (Non-Fossil Energy Capacity) ५०० गिगावॅटपर्यंत वाढवेल.
-भारत २०३० पर्यंत आपल्या एकूण उर्जेच्या गरजेपैकी ५० टक्के उर्जा गरज अपापरंपारीक (अक्षय) उर्जा स्रोतांपासून पूर्ण करेल.
-भारत २०३० पर्यंत एकूण संभाव्य कार्बन उत्सर्जनात १ बिलियन टन कपात करेल.5/6४.
-भारत २०३० पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेच्या कार्बन तीव्रतेला ४५ टक्के कमी करेल.
-भारत २०७० पर्यंत नेट झिरोचं लक्ष्य प्राप्त करेल.