२७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नवीन महाराष्ट्र पर्यटन विभागाची वेबसाईट आणि मोबाइल अँप्लिकेशन लाँच केले आहे. कोरोना काळात पर्यटन विभागाने केलेल्या कामाचा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पर्यटन विभागाने केलेल्या कामाचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतून केलं.
लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसला असताना देखील पर्यटन विभागाने नवीन सुविधा, रोजगाराच्या सुविधा आणि आखलेले धोरण हे कौतूस्कापद आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्य मंत्री आदिती ठाकरे आणि पर्यटन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतूक केलं.
पर्यटन विभाग नेहमी दुर्लक्षीत असणारा विभाग आहे. मात्र पर्यटन विभागाने यावेळी अत्यंत चांगलं काम केलं असून, महाराष्ट्रातली वेगवेगळी पर्यटन स्थळं ही महाराष्ट्रासाचं वैभव असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील पर्यटन विभागाने केलेल्या कामाचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं.
या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर राज्य मंत्री आदिती तटकरे या देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होत्या.