विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठा गदारोळ पाहायला मिळाला आहे. शिवसेनेचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावरुन सभागृहामध्ये मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाला. आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विधानसभेत एकच घोषणाबाजी सुरु झाली.
देशाच्या पंतप्रधानांची या सभागृहात नक्कल करणे, हे शोभनीय वक्तव्य नाही. भास्कर जाधव यांनी जाहीर माफी मागावी किंवा त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावं, अशी मागणी केली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य मी मागे घेतो, तसेच माझे अंगविक्षेपही मागे घेतो, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. माफी मागितल्यानंतर भास्कर जाधव यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
कोणताही असंसदीय शब्द न वापरता आपण मला माफी मागायला सांगितली. पण विरोधी पक्षनेत्यांनी संगितलं की आम्ही हक्कभंग आणणार आहोत. त्यांनी जरूर आणावा, मी त्यासाठी तयार आहे, असे खुले आव्हान देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आहे.
मी काय बोललो, ते शांतपणे ऐकून घ्या. मी म्हणालो, 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी ते कसे बोलले, ते मी सांगितलं. तेव्हा ते पंतप्रधान नव्हते. आता तुम्ही ही चालाखी करत आहेत की पंतप्रधान असं बोलले नाहीत. तुम्ही म्हणताय की ते पंतप्रधान असण्यापूर्वी बोललेत. तसंच मीही सांगतो. ते पंतप्रधान होण्यापूर्वी असं म्हणाले. याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केलेली नाही, मी एका उमेदवाराची नक्कल केली, असे स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी यावेळी दिले आहे