मुंबई: शिंदे फडणवीस सरकारमध्ये अधिका-यांचीही वर्णी लागली असून, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पाचव्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारून दोन आठवडे झाले तरी मुख्यमंत्री कार्यालयात कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती. गगराणी यांची मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. गगराणी यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयाबरोबरच नगरविकास, जलसंपदा आणि मराठा भाषा या विभागांचा कार्यभार सध्या तरी कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव हे प्रशासनात सर्वार्थाने महत्वाचे पद मानले जाते. गगराणी यांनी नारायण राणे आणि विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांचे उपसचिव तर देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम बघितले होते.
राज्यात सत्ताबदल होतात गगराणी हे उद्धव ठाकरे यांचे सचिवपदी काही काळ कायम होते. आता शिंदे यांचे अप्पर मुख्य सचिव या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.