आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी विविध घोषणा केल्या.तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
अजित पवार म्हणाले, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार अनुदान देण्याचं घोषित केलं होतं पण आर्थिक अडचणीमुळे हे वाटप करण्यात आलं नव्हतं. मात्र ही वचनपूर्ती आता होत आहे. याचा फायदा २० लाख शेतकऱ्यांना होईल. त्याकरता २०२२-२३ मध्ये १०,००० कोटी खर्च अपेक्षित आहे. भूविकास बँकेच्या ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2 वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.