1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

मार्क झुकरबर्गला सर्वात मोठा झटका

Mark-Zukerberg

मुंबई: सोशल मिडीया नेटवर्कवर मेटाचा संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी हे वर्ष कठीण ठरत आहे. तो आता जगातील 20 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. मेटा प्रमुख झुकरबर्ग यांनी 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत त्यांच्या संपत्तीपैकी 50 टक्के संपत्ती गमावली आहे.

मार्क झुकरबर्गच्या त्याच्या संपत्तीत इतक्या मोठ्या फरकाने घट झाल्याने झुकरबर्ग आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 20 व्या क्रमांकावर आहे. झुकरबर्गची सध्याची संपत्ती 2014 नंतर सर्वात कमी आहे. झुकरबर्गची निव्वळ संपत्ती गेल्या दोन वर्षांत US$106 बिलियन वरून US$55.9 बिलियनवर घसरली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की मेटा चीफने $71 अब्ज गमावले आहेत, जे आतापर्यंत त्याच्या एकूण संपत्तीच्या निम्मे आहे.

केवळ झुकरबर्गने आपली संपत्ती गमावली असं नाही तर इतर अब्जाधीशांच्या बाबतीतही असंच आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीतही 6 अब्ज डॉलरची घट झाली आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स यांना अनुक्रमे 27 आणि 26 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनाही 46 अब्ज डॉलरचे मोठं नुकसान झालं आहे.

नुकतंच झुकरबर्गने फेसबुकचं नाव बदलून मेटा प्लॅटफॉर्म केलं आणि फेसबुक मेटामध्ये बदलल्यानंतरच त्याची नेट वर्थ 14 स्थानांनी घसरली. मे 2020 पर्यंत, झुकरबर्ग $87.8 अब्ज संपत्तीसह अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता.

Avatar

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

Related Post

Instagram ने ‘Instagram Sans’ नावाचे फॉन...

May 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: इंस्टाग्रामने (Instagram) प्लॅटफॉर्मला नवीन स्वरूप देण्यासाठी त्याच्या प्लॅटफॉर्मसाठी ““brand refresh” (ब्रँड रिफ्...

Twitter ने Wordle spoiler bot ला निलंबित केले

January 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: अत्यंत लोकप्रिय इंटरनेट वर्ड पझल Wordle चे ट्विटरने बुधवारी bot account निलंबित केले. ह्या गेममध्ये दररोज फक्त एक ...

भारतातील पहिली डिजिटल लोकअदालत महाराष्ट्र, राजस्थान ...

August 8th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: राजस्थान राज्य विधी सेवा प्राधिकरण (RSLSA) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (MSLSA) यांच्यातर्फे भारतातील ...