देशभरातील नामांकित रुग्णालय म्हणून ओळख असलेलं याशिवाय राजकीय नेत्यांपासून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ज्या रुग्णालयात उपचार घेतात. त्या रुग्णालयातील भ्रष्टाचाराचं प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हे प्रकरण नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयातील राजेंद्र प्रसाद आय सेंटर मधील आहे. प्राथमिक तपासानंतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय हे प्रकरण इकोनॉमिक ऑफेंस विंगला रेफर करण्यात आलं आहे. या शिवाय या प्रकरणात एफआयआरदेखील दाखल करण्यात आलं आहे. एम्सकडून याची पुष्टी केली असली तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यापूर्वी एम्स ट्रॉमा सेंटरमधून भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरण समोर आलं होतं.
प्राप्त माहितीनुसार, आरपी सेंटरच्या जनरल स्टोअरशी संबंधित हे प्रकरण आहे. मेडिकल वस्तुंच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत विभागाने ऑडिटदेखील केलं होतं आणि जेव्हा याचा खुलासा झाला तेव्हा एम्स प्रशासनाने तपास सुरू केला. 19 ऑगस्ट रोजी येथे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यात आलं. याशिवाय अन्य स्टाफला ट्रान्सफर करण्यात आलं.