नागपूर: तामिळनाडुतील कन्नूर येथे बुधवारी लष्कराचे एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चीफ डिफेन्स स्टाफ ( CDS) बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. शोध मोहिमेत घटनास्थळी हवाई दल प्रमुख विवेक चौधरी यांच्यासह तामिळनाडूचे पोलीस महासंचालक सी.सेलेन्द्र बाबू उपस्थित होते. हवाई दलाच्या पाहणीत दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधील “ब्लॅक बॉक्स” सापडला आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण कळण्यास मदत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर मधील “फ्लाइट डेटा रेकॉर्डर“ आणि “कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर“ घटनास्थळी मिळाले असून ते ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी ३०० मीटर ते १ किमी शोध घेत असताना “ ब्लॅक बॉक्स “ सापडला. ब्लॅक बॉक्स मधून घडलेल्या घटनेचा शोध घेण्यास मदत होईल. या घटनेत १३ जणांच्या मृत्यू झाला असून १ ग्रुप कॅप्टन वरून सिंग तामिळनाडू येथील वेलिंग्टनमधील इस्पितळात मृत्यूला झुंज देत आहे.
तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते. IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरने सुलूर लष्करी तळावरून उड्डाण केले, काही वेळातच ते निलगिरी मध्ये कोसळले. त्याची वाटचाल वेलिंग्टन डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटकडे होती.