भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
पक्षाने बुधवारी पाच निवडणूक राज्यांसाठी आपल्या प्रभारींची घोषणा केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, सरोज पांडे, शोभा करंदलाजे, कॅप्टन अभिमन्यू, अन्नपूर्णा देवी आणि विवेक ठाकूर यांना यूपी निवडणुकीसाठी सह-प्रभारी बनवण्यात आले आहे.
उत्तराखंडसाठी पक्षाने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना जबाबदारी दिली आहे, सोबत लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आरपी सिंह यांनाही सह-प्रभारी बनवण्यात आले आहे.
उत्तराखंडासाठी पक्षाने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना जबाबदारी दिली आहे, सोबतच लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आरपी यांनाही सह-प्रभारी बनविण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा यांची पंजाब निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोवा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.त्याचबरोबर मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना प्रभारी बनवण्यात आले आहे.
2022 मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
मार्च-एप्रिलदरम्यान या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी आधीच तयारी केली आहे.
सध्या या पाच राज्यांपैकी चारमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तर पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.
या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका मिशन 2024 ची सेमीफायनल मानल्या जात आहेत.