नागपूर: विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या चार उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad Election) केली असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 9 जून हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
तर पाचवं नाव कुठल्या नेत्याचं असेल याबाबत चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी? पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता भाजपने आपली चार उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. तर पाचव्या जागी पंकजा मुंडे यांच्या नावाची घोषणा होणार की अन्य नेत्याला संधी मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
पाचव्या जागेसाठी भाजपच्या पंकजा मुंडे, चित्रा वाघ आणि सदाभाऊ खोत यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळात यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल. एकूण 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे.
यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. वाचा : विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून दोन नावं ठरली; सेनेच्या दिग्गज मंत्र्याला मंत्रिमंडळातून डच्चू? या आमदारांचा संपला कार्यकाळ रामराजे निंबाळकर सुभाष देसाई प्रविण दरेकर प्रसाद लाड सदाभाऊ खोत संजय दौंड विनायक मेटे दिवाकर रावते शिवसेनेचे दोन उमेदवार जाहीर शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी यांच्या नावांची घोषणा केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला.
त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचं पूर्नवसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. तर आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात आणि काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेचा धणुष्यबाण तळागाळात पोहचवला.