फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. एनसीबीचे सामील वानखेडे हे भाजपचे म्होरके आहेत. प्रसिद्धीसाठी खोट्या केसेस दाखल करून लोकांना फसविणायचे ते काम करत आहेत, असा आरोप अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. वडगाव येथील अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळावा व मार्गर्दर्शन शिबिरासाठी ते गुरुवारी आले होते. त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या बोगसगिरी बाबत अनेक पुरावे आहेत. येणाऱ्या काळात आणखी पुरावे सादर करणार आहे. दहशत निर्माण करण्यासाठी सध्या मंत्री, नेते, कार्यकर्ते यांची चौकशी करून केंद्र सरकार बोगसगिरी करीत आहेत. यंत्रणेचा कितीही गैरवापर केला तरी महाविकास आघाडीतील मंत्री, नेते , कार्यकर्ते घाबरणार नाहीत.
त्यावर एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले कि, जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईवरून नवाब मलिक मला जेल मध्ये टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो असे ते म्हणाले. सरकारची परवानगी घेऊन मी कुटुंबियांसमवेत मालदीवला गेलो होतो. मेल माझ्यावर खोटा आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाही केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. मलीक यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.