केंद्र सरकारचे नवीन नियुक्त ३९ केंद्रीय मंत्री यांची जन आशीर्वाद यात्रा २४ हजार किलोमीटर झाली आहे.
१५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु झालेली यात्रा २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत चालली असून, एकूण १४ दिवसांची हि यात्रा होती.
या यात्रेच्या दरम्यान जवळजवळ पाच हजार कार्यक्रम आयोजित केले गेले होते. भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक विधान दिले होते की, जन आशीर्वाद यात्रेला देशातील प्रत्येक कोपऱ्यातून प्रेम आणि आशीर्वाद मिळाला. तसेच त्यांनी या वेळी विरोधी पक्षांवर देखील निशाणा साधला.
आपल्या विधानात नड्डा यांनी म्हटले की, जन आशीर्वाद यात्रेच्या यशाला अनेक विरोधी पार्टीने अनेक विघ्न आणि अडथळे उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. पण मोदी सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा विश्वास डळमळला नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा संदर्भ देत नड्डा म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने गैरवर्तन केले आणि लक्ष्य केले ते आम्ही सर्व पाहिले.
नड्डा यांनी या घटनेला लोकशाहीवरील हल्ला म्हटले आणि जनतेच्या व्यापक पाठिंब्याने विरोधकांना विशिष्ट अजेंडा आणि विशिष्ट मानसिकतेसह मागे हटण्यास भाग पाडले.
देशवासियांनी विरोधकांच्या योजना फेटाळून विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे.
ते म्हणाले की, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्याचा प्रत्येक क्षण जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी समर्पित आहे.
देशातील जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान, केंद्र सरकार आणि भाजपकडून सातत्याने मिळत आहेत.