अफगाणिस्तानातील काबुलच्या विमानतळाबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या आता 85 इतकी झाली असून त्यात 13 अमेरिकन जवान आहेत ही बाब आज स्पष्ट झाली आहे. दरम्यान, इसिस या इस्लामिक दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे वृत्त आहे.
अशातच पुन्हा एक धक्कादायक माहितीनुसार आली आहे की,’या संघटनेमध्ये केरळमधील १४ जणांचा समावेश आहे. तालिबानने बगराम जेलमधून या सर्वाना मुक्त केले होते. तसेच तुर्कमेनिस्तानच्या दुतावासावर हल्ल्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन पाकिस्तानींना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
२०१४ मध्ये मोसूलमध्ये इस्लामिक स्टेटचा कब्जा झाल्यानंतर मलप्पुरम, कासरगोड आणि कन्नुर जिल्ह्यातील एक समूह भारत सोडून गेला होता. तेव्हा यातील काही कुटुंबांनी आयएकेपीमधून अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतात राहू लागले होते. यांचा वापर करून तालिबान आणि त्यांचे सहकारी भारताच्या प्रतिमेला नुकसान करू शकतात.
दरम्यान, विमानतळाबाहेर दोन बॉम्बस्फोटांबरोबरच गोळीबाराचाही प्रकार घडला होता. घाईगडबडीने काबूलमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर गर्दी केलेले अनेक जण यात बळी पडले आहेत. तेथे सुरक्षा बंदोबस्ताला असलेले अमेरिकन जवानही यात बळी पडल्याने अमेरिकेचे स्थानिक सुरक्षा अधिकारीही धास्तावलेले दिसून आले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचेही 28 जण आहेत असे सांगण्यात येते.