दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या GRP वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक धमकीचे पत्र पाठवले आहे. लष्कर-ए-तोयबाच्या एरिया कंमाडरच्या नावाने हे पत्र आहे. या पत्रामध्ये दिपावलीच्या तोंडावर भारतातील विविध रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधित रेल्वे स्थानकांमध्ये लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 46 रेल्वे स्थानकांचा समावेश केला गेला आहे. दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर, रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर वाराणसी, हापूर, लखनौसह 46 रेल्वे स्थानकांवर लष्कर-ए-तैयबाकडून उड्डाण करण्याच्या धमकीची दहशतवाद विरोधी पथक (ATS) चौकशी करणार आहे.
लष्कर-ए-तैयबाच्या नावाने धमकीचे पत्र कोणी पाठवले आहे, त्यामागील सत्य काय आहे, या संपूर्ण प्रकरणाची एटीएस चौकशी करणार आहे. सर्व पैलूंवर लक्ष ठेवून एटीएस या संपूर्ण घटनेचा तपास करणार आहे. धमकीचे पत्र आले कुठून? कोणी पाठवले? त्याची चौकशी केली जाईल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात आलं आहे.
लखनऊ, कानपूरसह संबंधित सर्व रेल्वे स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी आणि श्वान पथकासह सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. याशिवाय रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू आढळून आल्यास त्याची कसून तपासणी केली जात असल्याचे समजते.