1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात उभारणार कर्करोग रुग्णालय – अमित देशमुख

amit deshmukh2
Spread the love

नागपूर येथे कर्करोग रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असून लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी माहिती हिवाळी अधिशनादरम्यान दिली.

विधान परिषदेचे सदस्य गिरीश व्यास, डॉ. रणजित पाटील , अमरनाथ राजूरकर, नागोराव गाणार, अभिजीत वंजारी यांनी नागपूरमधील कर्करोग रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला होता.

यावर उत्तर देताना, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, की या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर कोरोनाची पहिली आणि नंतर दुसरी लाट आली. सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी व उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. नागपूर येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून कर्करोग इन्स्टिट्युट उभारण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. नागपूर येथील या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे, आस्थापनेवरील मनुष्यबळ या सर्वांसाठी प्रयत्न केले जातील.

Claim Free Bets

70 टक्के कर्करोग हा जीवन पद्धतीशी संबंधित

देशात सर्वाधिक कर्करोगाचे प्रमाण हे तंबाखू खाणे, धूम्रपान करणे, अल्कोहोल घेणे यात आहे. 40 टक्के भारतातील जो कर्करोग आहे, तो डायरेक्ट तंबाखूशी संबंधित आहे. दुसरा प्रकार येतो लठ्ठपणा. लठ्ठपणा हा शहरीकरणामुळे वाढत चाललेला आहे. या लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणामुळे आपले फॅक्टसेल वाढल्याने कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढत जाते. 70 टक्के कर्करोग हा जीवन जगण्याच्या पद्धतीशी संबंधित असल्याने आपण काय खातो, कसे राहतो यावर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे आपण अमेरिकन जीवन पद्धती सोडून भारतीय पद्धतीच अवलंबली पाहिजे, अशी माहिती ज्येष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. मिनेश जैन यांनी दिली.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी लावलेले बैनर मनपा पथक...

    May 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपुरात नवा वाद पेटण्याची शक्यता नागपूर: शहरात ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आज दि २८ मे रोजी खासदार नवनीत राणा ...

    राज्यपाल महोदय, महाराष्ट्र द्वेषाच्या आजारातून लवकर ...

    August 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुबंई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यांनतर विरोधकांनी त्यांच...

    त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअजित पवार भर पत्रकार परिषदेत कडाडले मुंबईत ड्रग्जप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या त्यावेळी कुणी तरी राज्याचे उपम...