117 जागांवर उमेदवार उभे करणार
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. तसेच पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमधील राजकीय पेच अधिक वाढत चालला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. पक्षाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, काँग्रेसपासून वेगळा पक्ष काढणार असल्याचे त्यांनी म्हटलं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस आणि त्यांच्या गटात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. आता अमरिंदर सिंग दिवाळीपूर्वी मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहेत.
शेतकरी मुद्यावर उद्या गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे अमरिंदर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. मी अमित शाह यांची तीन वेळा भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अरुसा आलम यांच्यावर त्यांनी भाष्य केले. अरुसा आलम या गेल्या 16 वर्षांपासून भारतात येतात. पुन्हा व्हिजा सुरु झाला तर नक्कीच त्यांना बोलवेल, असेही सिंग म्हणाले.
नवज्योत सिद्धू जिथून निवडणूक लढवतील तिथे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केला जाईल. माझ्या पाठीशी अनेक नेते उभे आहेत. विधानसभा निवडणुकीत 117 जागांवर उमेदवार उभे करू, असे सिंग यांनी स्पष्ट केले.