काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा टाकला आहे. पी. चिदंबरम यांच्या सात ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. चिदंबरम यांच्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि तामिळनाडू येथील कार्यालयांवर आणि घरांवर कारवाई सुरू आहे.
सीबीआयने चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावर कथित विदेशी गुंतवणुकीप्रकरणी ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. २०१०- २०१४ दरम्यान सीबीआयने या प्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्याच प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. २०१०- २०१४ दरम्यान विदेशात पैसे पाठवण्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले की, “मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? रेकॉर्ड असेल.” पी चिदंबरम हे काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत.