भाजप आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाष्यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणणे मांडले आहे. केंद्राने ऑफर दिली असेल ते न स्वीकारणे एवढे पवार कच्च्या गुरुचे चेले नाही, असे म्हटले आहे.
सीबीआय आणि ईडीकडून राज्यातील मंत्री आणि काही नेत्यांची चौकशी सुरु आहे. त्यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. पवार म्हणाले भाजपकडून सत्तेत येण्यासाठी ऑफर होती. मी नाही म्हटले, म्हणून राष्ट्रवादीला त्रास दिला जातोय. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पवार हे सगळ्यांचे गुरू आहे. त्यामुळे पवार आणि त्यांचे शिष्य काही झाले तरी त्याचे खापर केंद्रावर फोडत आहेत. कोळशाबाबतही केंद्राने सांगितले होते पावसामुळे कोळसा कमी मिळेळ. वेळेच साठा करुन ठेवा. मात्र त्यांनी तो केला नाही. आता यांचे कसे झालेय, नाचता येईना आणि अंगण वाकडं, असा टोला त्यांनी राज्य सराकरला हाणला आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांची नाराजी काही ताटात पडून घेण्यासाठी असते. काही निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही, असे काँग्रेस नाराजीवर आपले मत व्यक्त केले. नागपुरात फडणवीस मुख्यमंत्री असताना खूप टीका व्हायची. आता नितीन राऊत झोपा काढत आहे का, असा सवाल त्यांनी केला.