राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने काल जारी केला. या निवडीमुळे राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. यावर भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे ‘2 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने दिलेल्या लढ्याला यश मिळालं राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते तसेचं इतर सदस्यांची नियुक्तीही त्वरीत करावी म्हणजे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल’ असे चित्रा वाघ म्हणाल्या.