नागपूर : पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी २० फेब्रुवारी ला वोटिंग केले जाईल. नेत्यांच्या निवडणूक रॅली एकामागून एक सुरूच आहे. या रॅलीमध्ये विविध दावे नेत्यानंकडून केले जातात. असेच एक विधान पंजाबचे मुख्यमंत्री चरांजीत सिंग चन्नी याने केले आहे. ज्यात ” यूपी-बिहार वाले भैय्या” अशा शब्दांचा वापर केला आहे.
चन्नीच्या या विधानावरून विरोधी पक्षांनी ध्रुवीकरणाचा आरोप केला आहे.
आता सीएम चन्नी यांच्याकडून यूपी आणि बिहारचा उल्लेख करणाऱ्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण आले आहे. आपल्या स्पष्टीकरणात चन्नी म्हणाले, “माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. पंजाबमध्ये विकासासाठी प्रवासी येतात, केजरीवाल अराजकता पसरवतात.” पण चन्नी यांनी यावर उत्तर द्यायला खूप उशीर केला आहे.
कारण या मुद्द्यावरून त्यांच्या विरोधी पक्षांनी आतापर्यंत त्यांच्यावर अनेक प्रकारे हल्ला केला आहे. त्याचबरोबर चन्नी बाहेरून येणाऱ्या लोकांना विरोध करत असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पंजाबच्या रॅलीत चन्नी यांनी विधान केले तेव्हा तिथे प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या. जेव्हा चन्नी यांनी “यूपी-बिहार वाले भैय्या” हे विधान केले त्यावेळेस प्रियांका गांधी यांनी देखील हात वर करून टाळ्या वाजविल्या होत्या. यावरून भाजप आणि आम आदमी पार्टीने त्यांच्यावर निशाणा साधला.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, चन्नी म्हणाले की पंजाबचे सरकार पंजाबी चालवतील. मला वाटत नाही की यूपीमधून कोणी येऊन पंजाबमध्ये राज्य करावे, तसेच यूपीच्या जनतेला पंजाबमधून कोणी येऊन राज्य करावे असे वाटत नाही. काहीही ट्विस्ट करणे हे त्यांचे काम आहे, त्यांच्यासोबत संपूर्ण मीडिया आहे. हे लोक काहीही फिरवतात. एका संदर्भात चन्नीजी बोलत होते.