पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरांजीत सिंग चन्नी यांनी शपथ घेतली आहे. सुखविंदर सिंग रंधावा आणि ओपी सोनी यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
पंजाबमध्ये प्रथमच २ उपमुख्यमंत्री झाले आहेत. शपथविधी सोहळा सकाळी ११ वाजता होणार होता, पण राहुल गांधी याना यायला २२ मिनिटं उशीर झाल्यामुळे कार्यक्रम उशीरा सुरु झाला.
ते आल्यानंतर शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. राहुल गांधी राजभवनात पोहचले. तर मुख्यमंत्रीपदावरून पायउतारा झालेले कॅप्टन अमरिंदर सिंग शपथविधीला उपस्थित नव्हते.
चरणजित सिंग चन्नी पंजाबच्या इतिहासातील पहिले दलित मुख्यमंत्री बनले आहे
त्याचबरोबर जाटसिख समाजातील सुखजिंदर सिंग रंधावा आणि हिंदू नेता म्हणून ओपी सोनी याना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
यापूर्वी सोनी यांच्या जागी ब्रह्ममोहिंद्राचे नाव जाहीर करण्यात आले होते. मोहिंद्रा हे कॅप्टन अमरिंदर यांच्या गटातील आहेत, त्यामुळे त्यांचे नाव अखेरच्या क्षणी बाद करण्यात आले.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिद्धू यांच्या पाठिंब्याने चन्नी मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवण्यात यशस्वी झाले.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर खुर्ची रिकामी झाली.
चरणजित सिंग चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर आता सर्वांची मंत्रिमंडळावर नजर राहील. चन्नी आतापर्यंत तंत्रशिक्षण मंत्री होते.
त्यांना आता कोणते मंत्रालय मिळेल? दोन उपमुख्यमंत्र्यांची काय जबाबदारी असेल. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आता मंत्री कोण होणार आणि कॅप्टन सरकारच्या मंत्र्यांमधून कोणाचा पत्ता कट होणार? चन्नी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून काँग्रेसने दलित मतदारांना साधण्याची युक्ती लढवली आहे.
दुसरीकडे, आगामी निवडणुका काँग्रेस कोणाच्या नेतृत्वात लढणार यावरून काँग्रेसमध्ये आताच वाद सुरू झाले आहेत.
राज्य प्रभारी हरीश रावत यांच्या मते, सिद्धूंच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवाव्यात, तर ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी यावर जाहीर आक्षेप घेतला आहे.