1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राणेंच्या घरापुढे आंदोलन करणा-या युवासैनिकांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

yuvasena2
Spread the love

राज्यात कालपासून नारायण राणे आणि त्यांचे वक्तव्य यावरुन एकच चर्चा रंगली आहे. त्यावरुन झालेला राडा, नारायण राणेंची अटक, सुनावणी, जामीन, सुटका हा सगळा नाट्यमय प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. शिवसेना आणि नारायण राणे संघर्ष राज्याला नवा नसला तरी यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. अशातच आता राणेंच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

मंगळवारी मुंबईत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. युवासैनिकांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केले. यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर येत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुंबईत वाढत आहे कोरोना….!!!

    May 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपासून राज्यात द...

    जगात १ हजार वर्षानंतर प्रथमच दिसणार दीर्घ खंडग्रास च...

    November 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुढच्या आठवड्यात एका अद्भुत खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याची संधी पृथ्वीवासियांना मिळणार आहे. जगात १ हजार व...

    ठाकरे सरकारच्या मताला न्यायालयात केराची टोपली

    March 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमुंबई: राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून त्यांनी अनेक विषयात न्यायालयाच्या थपडा खाल्ल्या...