मुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंहावर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरु आहे अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे. न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत त्यांनी आपली मते मांडली. न्यायव्यवस्थेत बदल व्हावेत, हे सांगताना देशातले कोर्ट रिकामे पडले पाहिजेत, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी, अशीही अपेक्षा व्यक्ती केली आहे. मात्र, त्यांनी बोलताना नामोल्लेख टाळत परमबीर सिंगांना टोला देखील लगावला आहे. आमच्याकडे तक्रारदार गायब आहे, मात्र खटला सुरुच आहे, अशी परिस्थिती आहे. नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करणारी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. समाजातील गुन्हेगारी नष्ट होऊन कोर्ट रिकामे व्हावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच एखाद्याची मर्जी वेगळी आणि त्याचा अधिकारी वेगळा आहे, स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या विधी तज्ज्ञांनी करावी असे मतही त्यांनी मांडले.