1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

देशभरात 75 दिवस 75 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम राबविणार

Swachh-Bharat- Abhiyan

नवी दिल्ली: केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्यभार), राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अवकाश डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दि १६ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय समुद्र किनारे स्वच्छता दिन 2022’ तयारीची आढावा बैठक संपन्न झाली. हा दिवस 17 सप्टेंबर 2022 रोजी पृथ्वी भवन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मुख्यालयात साजरा करण्यात येईल.

हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दर वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो, असे डॉ सिंग यांनी सांगितले. यावर्षी हा कार्यक्रम 17 सप्टेंबरला साजरा होणार आहे. योगायोगाने त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस देखील असतो. पंतप्रधान मोदी हे स्वच्छतेबद्दल आग्रही असतात आणि त्यांनी देशात स्वच्छतेची, समुद्र किनारे, पर्यावरण आणि हवामान यांचे सर्व प्रकारे संरक्षण याची सुरवात केली आहे.

सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करतो आहोत असे डॉ सिंग म्हणाले, 3 जुलै ते 17 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांत देशातील 75 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविली जाईल. या वर्षीचा कार्यक्रम विशेष असणार आहे, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कालावधीचा असेल आणि यात लोकांचा आजवरचा सर्वाधिक सहभाग असेल. देशाच्या किनारी भागांच्याच नाही तर इतर भागांच्या समृद्धीसाठी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ हा संदेश पोहोचविण्यासाठी यात सामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा आहे, असे डॉ सिंह यांनी सांगितले.

समुद्र किनाऱ्यांवरून 1,500 टन कचरा काढणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे, ज्यामुळे सागरी जीवांना मोकळा श्वास घेता येईल आणि किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ होईल.

Avatar

RAHUL PATIL

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

एयर इंडिया एक्सप्रेस (Air Indian Express Flight) IX-...

September 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: मस्कत येथून कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जंसी लँडींग करण्यात आलं. एयर इंडिया एक्सप्रेस (Air Indian ...

भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा महिला सुरक्षेवरुन य...

October 23rd, 2021 | RAHUL PATIL

वाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी महोत्सवच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना महिला सुरक्षेवरून भाजपच्या राष्ट्रीय उप...

देशातील सरकारी संस्था तोट्यात; मग नोक-या कुठून देणार?

February 2nd, 2022 | RAHUL PATIL

अर्थमंत्र्यांना सतीश चव्हाण यांचा रोखठोक सवाल यंदाचा अर्थसंकल्प हा विकासाचा आभास निर्माण करणारा आहे. सर्व सामान्य जनता, शे...