1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

“Cloud & Metaverse Summit 2023”; तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात मोठा समिट संपन्न 

नागपूर: तंत्रज्ञानांच्या क्षेत्रात ‘क्लिक2 क्लाउड’ हि नागपुरातील नावाजलेली कंपनी आहे. या कंपनीचे ध्येय नागपूरला भारताची ‘क्लाऊड सिटी’ बनवायचे आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने देशात हेल्थकेअर, कृषी या क्षेत्रात बदल घडवून आणण्याचे अतुलनीय काम ‘क्लिक2 क्लाउड’ कंपनी करत आहे. ‘क्लिक2 क्लाउड’ कडून २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत आभासी पद्धतीने “Cloud & Metaverse Summit 2023” हे व्हर्च्युअल क्षेत्रातील क्लाउड प्रगतीला चालना देणारे समिट आयोजित करण्यात आले होते.

हेल्थकेअर, कृषी आणि गेमिंग इनोव्हेशन्सचे बिल्डिंग ब्लॉक्स एक्सप्लोर करण्यासाठी तंत्रज्ञानशास्त्रज्ञ, उद्योजक आणि विकासकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा एक उपक्रम होता. तंत्रज्ञान क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी नेक्स्ट-जनरेशन क्लाउड सोल्यूशन्स व्हर्च्युअल ट्रान्सफॉर्मेशनला सशक्त बनवण्याची ही एक संधी होती.

भारतात ओपन सोर्स क्षेत्रात होणारे बदल, मेटाव्हर्स मार्केट ट्रेंड्स, मेटाव्हर्समधील संधी, डेटा फ्लो ओरिएंटेड रोबोटिक आर्किटेक्चर, वेबक्साआर ओपन सोर्स प्रोजेक्ट, मेटाव्हर्स डेव्हलोपमेंट, क्लाऊड टेकनॉलॉजि फॉर मेटाव्हर्स, अशा विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी भाष्य केले. या “Cloud & Metaverse Summit 2023” ला कॉलेज विध्यार्थी, आयटी कर्मचाऱ्यांचा जगभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या समिटमध्ये जगभरातील मोठ्या कंपनींचे दिग्जज वक्त्यांनी भाष्य केले. क्लिक2 क्लाउडचे संस्थापक आणि सीईओ श्री. प्रशांत मिश्रा यांनी हेल्थकेअरमधील आव्हाने, तसेच कंपनीने तयार केलेल्या हेल्थऑप्टिक्स या अँपच्या साहाय्याने, आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तूम्ही तूमच्या आरोग्यावर कसे नियंत्रण ठेऊ शकता हे सांगितले. शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणायला तंत्रज्ञानाच वापर कसा करावा याची देखील सखोल माहिती दिली.

क्लिक2 क्लाउडच्या बिझिनेस हेड(cloud BU -APAC) रुपल शिरपूरकर, एनी लाय (बोर्ड डायरेक्टर फिउअचरवे) सॅनफ्रान्सिस्को येथून वेब 2.0 ते 3.0 (2D ते 3D) यातील बदल, मेटाव्हर्स टेक कसे बदलू शकतो याबद्दल बोलल्या. संचालक (विक्री कार्यक्रम धोरण आणि भागीदार) मायक्रोसॉफ्टचे शमिक दास हे सियाटल येथून तंत्रज्ञान, आयटी क्षेत्रात येणाऱ्या काळातील बदल याविषयी बोलले. आयबीएमचे उपाध्यक्ष ओपन टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपर अॅडव्होकेसी टॉड मूर,ओपन मेटाव्हर्स फाउंडेशन- लिनक्स फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक रॉयल ओ’ब्रायन असे अनेक नावाजलेले वक्ते या समिटमध्ये बोलले.

हे समिट निखिल अपराजित यांनी होस्ट केले. या समिटमध्ये विविध क्विझ देखील घेण्यात आले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यात होता. अनेकांनी आकर्षक बक्षिसे देखील जिंकली.

Events-papercutting

लोकशाही वार्ता, द हितवाद सिटीलाईन आणि इतर अनेक नामवंत प्रकाशकांनीही या तंत्रज्ञानावर चालणारा कार्यक्रम फिचर केला.

THE FREE MEDIA

THE FREE MEDIA

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

‘स्वाभीमानी’ शेतकरी नाही तर राजकीय संघटना; एल्गार ऊस...

October 23rd, 2021 | RAHUL PATIL

कोल्हापूर येथील शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तक्त्यात आंदोलन अंकुश, जय शिवराय शेतकरी संघटना व बळिराजा शेतकरी संघटनेच्य...

योजनेला बदनाम करणं योग्य ठरणार नाही: देवेंद्र फडणवीस...

October 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

फडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेली देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला क्लीन...

महाइगाईचा झटका..!! घरगुती सिलेंडर पुन्हा महागले

October 1st, 2021 | RAHUL PATIL

ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ...