मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. भाजपनेही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. याच पार्श्वभूमीवर आता भोंग्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र भोंगाकार राज ठाकरेच या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजतंय
राज्याच्या गृहविभागामार्फत आज भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील. मात्र ज्यांनी हा भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला ते राज ठाकरेच या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे आश्चर्य वाटत आहे