केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार टोलेबाजी केली. नितीन गडकरींच्या या टोलेबाजीवरुन सभागृहात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी असतात असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरींचे हे विधान अशा वेळी आले आहे ज्यावेळी भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरी जाहीर कार्यक्रमात म्हणाले, आजकाल प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत प्रत्येकजण दु:खी आहे. मंत्रिपद न मिळाल्याने आमदार दु:खी आहेत. चांगले खाते न मिळाल्याने मंत्री दु:खी आहेत. तर जे मुख्यमंत्री बनले आहेत ते सुद्धा दु:खी आहेत याचं कारण म्हणजे कधी मुख्यमंत्री पद जाईल याची त्यांना भीती सतावत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात कार शिरली
नितीन गडकरी हे राजस्थान विधानसभेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी ते म्हणाले, राजकारणाचा मुख्य उद्देश हा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणे आहे. परंतु आजकाल ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी असल्याचं पाहिजे जात आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश लोकशाहीचा आहे.