1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

क्रिकेटपटू गावसकरांना ‘सनी’ टोपण नाव देणारे प्रशिक्षक वासू परांजपे कालवश

jatin paranjape
Spread the love

क्रीडा क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षक व क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून नावाजलेले वासू परांजपे यांचे निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. फलंदाज असो वा गोलंदाज, प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार त्याला प्रशिक्षण देणारा व्यक्ती म्हणून वासू परांजपे यांची ओळख होती. बडोदा आणि मुंबईसाठी त्यांनी २९ प्रथम श्रेणी सामने खेळले होते.

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर परांजपे प्रशिक्षणाकडे वळले. गुणवत्तेची योग्य पारख करणारा अवलिया म्हणून त्यांना ओळखले जात होते. एकदा त्यांनी १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची मुश्ताक अली यांना ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले होते, की हा सुनील गावसकरानंतर देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे.

सुनील गावसकर, ,सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, राहुल द्रविड, संदीप पाटील, अनिल कुंबळे, युवराज सिंग, रमेश पवार यासोबतच श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, रोशन महानामा यांना वासू परांजपे यांनी मार्गदर्शन केले आहे. गावसकरांना ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांचे ते वडील होते.

परांजपे आणि रोहित शर्मा..

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माच्या कारकिर्दीतही परांजपे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. वानखेडे स्टेडियमवर १७ वर्षांखालील क्रिकेट शिबिर सुरू होते. ३० संभाव्य खेळाडूंपैकी १५ जणांची संघात निवड होणार होती. रोहित नेट्समध्ये फलंदाजी करत होता. वासू परांजपे हे रोहितची फलंदाजी पाहत होते. त्यावेळी त्यांनी संघाच्या कर्णधाराला जाऊन रोहित संघात असायला हवा, असे सांगितले. तेव्हा प्रशांत नाईक संघाचा कर्णधार होता. प्रशांत तेव्हा रोहितला ओळखतही नव्हता, त्याने रोहितला वासू सरांनी त्याच्याशी केलेली चर्चा सांगितली होती.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    BCCI च्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली

    November 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयसीसीने घेतला महत्वाचा निर्णय, नऊ वर्षानंतर केला महत्वाचा बदल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अस...

    केंद्रीय कर्मचा-यांच्या पगारात होणार वाढ

    May 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ...

    नव्या मंत्र्यांच्या यादीवरून वाद सुरूच, आता तीन दिवस...

    July 28th, 2022 | THE FREE MEDIA

    Spread the loveमुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अत्यंत कठीण असल्या...