नागपूर: महाविकास आघाडी सरकार (mva government) पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार (shinde government) आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (cm ekanath shinde) हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.
एकीकडे शिंदे गटावर शिवसेना (shivsena) कारवाई करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाला केंद्रातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातून कुणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. शिंदे सरकारचा लवकरच मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होणार आहे. पण, शिंदे गटाला आा केंद्रातून सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे.
बिहारमधून जदयू कोट्यातून नवा चेहरा दिला जाणार आहे. यासाठी शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. येत्या 18 जुलै रोजी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधीच हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातला हा दुसरा फेरबदल ठरण्याची शक्यता आहे. (मुख्यमंत्री होणार हे कधी समजलं? एकनाथ शिंदेंचं उत्तर वाचून बसेल आश्चर्याचा धक्का) एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांवर शिवसेनेनं कारवाई केली असून हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. 11 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
त्यामुळे 11 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या आधी हा फेरबदल होणार आहे. त्याचबरोबर ज्या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहे, त्या राज्यातील नेत्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले. आता केंद्रातून मंत्रिपद देऊन पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.