24 तासात 197 जणांचा मृत्यू
देशात कोरोना संसर्गामध्ये झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सोमवारच्या तुलनेत गेल्या 24 तासांत कोविड-19 रुग्णांमध्ये आणखी घट झाली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत देशात 8 हजार 865 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. याशिवाय, गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 197 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11 हजार 971 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दिलासादायक बाब ही की तब्बल नऊ महिन्यांनंतर देशात सर्वात कमी करोना रुग्ण मिळाले आहेत.
287 दिवसांनंतर मिळाले कमी रुग्ण
दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच देशातील कोरोना बाधितांची संख्या एवढी कमी झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल नऊ महिन्यांनंतर (२८७ दिवस) देशात २४ तासांत इतके कमी कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. याशिवाय, आता देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1,30,793 वर आली आहे, जी गेल्या 525 दिवसांतील सर्वात कमी आहे.
संसर्ग दर 0.80 वर पोहोचला
आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन संसर्ग दर 0.80 टक्क्यांवर आला आहे. जो गेल्या ४३ दिवसांपासून दोन टक्क्यांच्या खाली आहे. तसेच साप्ताहिक संसर्ग दर 0.97 टक्के आहे.